महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर सोमवारी रात्री कटोलजवळ हल्ला झाला. नरखेड गावातील प्रचार सभेहून परतताना त्यांच्या गाडीवर बेलफाटा येथे दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात देशमुख जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा निर्माण झाली आहे.