Arvind Sawant: 'इम्पोर्टेड माल' प्रकरण अरविंद सावंत यांना भोवलं! शायना एनसींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

राजकीय विधानामुळं टीकेचे धनी झालेल्या शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना हे प्रकरण चांगलंच भोवलं आहे. शिवसेनेच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Arvind Sawant News
Arvind Sawant Newsesakal
Updated on

मुंबई : 'इम्पोर्टेड माल' या विधानामुळं टीकेचे धनी झालेल्या शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना हे प्रकरण चांगलंच भोवलं आहे. शिवसेनेच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अरविंद सावंत यांनी आपल्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली असा दावा करत शायना एनसी यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर आता सावंत यांच्यावर FIR दाखल करण्यात आला आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. भारतीय न्याय संहिता कलम 79 आणि कलम 356 (2) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Arvind Sawant News
India Global Mediator: जागतिक मध्यस्थ म्हणून भारताचं स्थान बळकट; BRICS आणि G7 परिषदांमध्ये भारताची भूमिका ठरली महत्वाची
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.