कोल्हापूर :अनेक वर्षे मी सामाजिक चळवळीत अग्रेसर राहिलेला कार्यकर्ता आहे. त्यातून मला शासनाने ‘दलितमित्र’ पुरस्काराने गौरवले. सूतगिरणी, जिल्हा परिषद सदस्य या माध्यमातून मी मतदारसंघाच्या संपर्कात होतोच. नवे उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आणि गेल्या अनेक वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर मतदारसंघाच्या विकासासाठी रिंगणात उतरलो आहे, असे ‘जनसुराज्य’चे उमेदवार अशोकराव माने यांनी सांगितले.