मुंबईः राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीमध्ये उमेदवारांना जो खर्च करायचा आहे, त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बंधनं घालून दिलेली आहे. त्याचं पालन उमेदवारांना करावं लागणार आहे. नाहीतर आचारसंहिता भंग होऊन संबंधितांवर कारवाई होणार आहे.