Uddhav Thackeray: साहेब, हेच का निष्ठेचं फळ! शिंदेंकडून ठाकरेंकडे गेलेल्या म्हात्रेंना उमेदवारी; जिल्हाप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा

Sadanand Tharwal बुधवारी शिवसेना ठाकरे गटाकडून यादी जाहीर करण्यात आली असून दीपेश यांच्या नावाची घोषणा डोंबिवली विधानसभा मतदारसंघात केली आहे. ही उमेदवारी जाहीर होताच थरवळ यांनी आपला राजीनामा सोशल मीडियावर प्रसिध्द केला आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत हा राजीनामा दिला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

डोंबिवलीः शिवसेना शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील निष्ठावंत नाराज असल्याची चर्चा गेले अनेक दिवस कानावर होती. अखेर बुधवारी म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. संघर्ष काळात सदैव एकनिष्ठ राहणारा शिवसैनिक दुर्लक्षितच राहणार असेल, तर साहेब या निष्ठेचे फळ काय? असे म्हणत त्यांनी आपली नाराजी उघड केली आहे. समाज माध्यमातून हा राजीनामा व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.