Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawarsakal

Assembly election seat allocation: महायुतीमध्ये लढण्याचा फॉर्म्युला ठरला! भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती

Chandrashekhar Bawankule: ‘‘उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे सत्ता दिली. ते कधी मंत्रालयात गेले नाही. विधानभवनात गेले नाही. हे आता जुनी पेन्शन देऊ असे खोटे बोलत आहेत. आमचे सरकार सगळे प्रश्न सोडवत आहे,’’ असे बावनकुळे म्हणाले.
Published on

नागपूरः ‘‘महायुतीच्या तीनही नेत्यांनी जागा वाटपासाठी ८० किंवा ९० अशा कुठल्याही आकड्याचा आग्रह धरला नाही. जेथे अजित पवार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह, जिथे शिंदे गटाचे आमदार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह व जेथे भाजपचे उमेदवार जिंकतील तेथे आमचा आग्रह मान्य करू. आम्ही जिंकण्यासाठी लढण्याचे सूत्र निश्चित केला असून आतापर्यंत ७० टक्के जागांवर एकमत झाले आहे,’’ असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Loading content, please wait...