नागपूर : राज्य सरकारच्या लाडक्या बहिणीची सर्वत्र चर्चा होत असताना, नागपूर जिल्हा परिषदेतील रणरागिणीही चर्चेत मागे नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या जिल्हा परिषदेच्या महिला पदाधिकारी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यातही उतरणार असल्याचे दिसून येत आहे. यावेळी सुद्धा कॉंग्रेसच्या रणरागिणी कोणता करिष्मा दाखवितात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.