राज्यात २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. यानंतर राज्यातील अनेक भागातून रक्कम आढळून आली आहे. तर झारखंडमध्येही निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे. तिथेही मोठ्या प्रमाणात रक्कम आढळून आली आहे. ही रक्कम जवळपास ५०० कोटींच्या पुढे असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई केली आहे.