गोवा हे पर्यटन राज्य असल्याने तसेच दारू स्वस्त मिळत असल्याने येथील दारूला मोठी मागणी असते.
बांदा : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) रणधुमाळी सुरू असून, प्रचारही शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीत पार पाडावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) पूर्ण तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४ दिवस ‘ड्राय डे’ (Dry Day) जाहीर केला आहे. निवडणूक कालावधीत इतर राज्यांतून महाराष्ट्रात दारू येण्याची शक्यता असल्याने दारूबंदीची अंमलबजावणी गोव्यातही करण्याचा निर्णय बॉर्डर परिषदेत घेतल्याने गोव्यावर अवलंबून असलेल्या तळीरामांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.