मुंबई: दलित-आदिवासींना कोणती पदे दिली, याचा सभांमध्ये उल्लेख करून भांडवल केले गेल्याने त्यांचा अपमान होत आहे. ही गद्दारी असल्याच्या शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले. मविआच्या ‘महाराष्ट्रनामा’ या जाहीरनाम्याच्या प्रकाशनात ते बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.