Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक लढवण्यासाठी शिंदेंनी विकली ५० एकर शेती; तरीही २४ निवडणुकांत पराभवच

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बाबासाहेब शिंदे यांनी घनसावंगीतून पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ५० एकर शेती विकून त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली असून, २४ निवडणुका लढविल्या आहेत.
Babasaheb Shinde  Assembly election 2024
Babasaheb Shinde sakal
Updated on

जालना : सध्या महाराष्ट्रात लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव अर्थात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी (ता. २८) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक असताना अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, अशातच दहावेळा लोकसभा, तर १४ वेळा विधानसभा लढलेले बाबासाहेब शिंदे यांनी घनसावंगीतून उमेदवारी अर्ज भरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.