राहाता : डॉ. जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांच्या गळ्यात विखेंचा पट्टा आहे. ते खालच्या भाषेत बोलत होते. अन् डॉ. सुजय विखे पाटील टाळ्या वाजवत होते. तुम्हाला आणखी बोलण्याची संधी देऊ, असे सांगत होते. ही टीका केवळ डॉ. जयश्री यांच्यावर नव्हे, तर राज्यातील सर्व माता-भगिनींवर आहे. त्याला विखे हेच जबाबदार आहेत. दहशत नेमकी कुणाची आणि विकास नेमका कोण करतो, याबाबत संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघांची तुलना होऊन जाऊ द्या, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान दिले.