Barshi Politics : बार्शीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीतच लढत; कोणाचं पारडं जड, राऊत की सोपल?

Barshi Assembly Constituency Politics : बार्शी विधानसभा मतदार संघात (Barshi Assembly Constituency) महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahayuti) असा दुरंगी सामना होणार आहे.
Barshi Assembly Constituency Politics
Barshi Assembly Constituency Politicsesakal
Updated on
Summary

माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यापासून काडीमोड घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

बार्शी : मराठवाड्याचे प्रवेशद्वार, मेडिकल हब, मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या तसेच संपूर्ण १३८ गावे समाविष्ट असलेल्या बार्शी विधानसभा मतदार संघात (Barshi Assembly Constituency) महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahayuti) असा दुरंगी सामना होणार आहे. विद्यमान आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) महायुतीकडून तर माजीमंत्री दिलीप सोपल अथवा माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. लोकसभेला महाविकास आघाडीने घेतलेल्या मताधिक्क्यामुळे विधानसभेला पारडे जड दिसत असून कोणाचा विजय होणार याबाबत राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.