परळी : राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार पहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मतदारसंघातील चार मतदान केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर धुडगूस घालण्यात आला आहे. इथली ईव्हीएम मशिन्स देखील फोडण्यात आली. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या या घटनांमुळं महाराष्ट्रात हादरला आहे. यामुळं या मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया बंद झाली आहे.