मुंबईः राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. २० तारखेला मतदान प्रक्रिया पार पडेल तर २३ तारखेला निकाल हाती येणार आहेत. दुसरीकडे टपाली मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. या मतदानावेळी बीडच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने टपाली मतदानाचे फोटो गावी पाठवले. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.