कागलचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार म्हणाले, ‘‘मारामारीचे प्रकार घडणार असतील तर येथून पुढे असे कार्यक्रमास कागलमध्ये घेण्यास परवानगी दिली जाणार नाही.’’
कागल : येथील गैबी चौकात एका कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे गट (Samarjit Singh Ghatge Group) व पालकमंत्री हसन मुश्रीफ गटाच्या (Hasan Mushrif Group) कार्यकर्त्यांमध्ये काल राडा झाला. एकमेकांना धक्काबुक्की आणि दगडफेक झाली. चौकातील मोटारसायकली पाडल्या गेल्या. याप्रकरणी पोलिसांत दोन्ही बाजूकडून कसल्याही प्रकारची फिर्याद देण्यात आलेली नाही. त्यामुळे गुन्हा नोंद झालेला नाही.