लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून सुमारे ५० हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आवताडे यांची धाकधूक वाढली आहे.
Pandharpur Mangalvedha Assembly Election Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार याचा सस्पेन्स आजही कायम आहे. अशातच भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) हे ऐनवेळी अपक्ष निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. दुसरीकडे भगिरथ भालके यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेच्या दिलीप धोत्रे यांनीही मतदारसंघात तयार केली असल्याने चौरंग लढत होण्याची चिन्हे आहेत.