मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक 200 पेक्षा अधिक उमेदवार निवडूण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिॅदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले .
या निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या, त्या पाठोपाठ शिवसेना एकना शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने जास्त जागा जिंकल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे, पण महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात. जाणून घेऊया यामागील कारणे..