भंडारा/लाखांदूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्व राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची धावपळ सुरू झाली, तर काही उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाले. मात्र,विधानसभा क्षेत्रात भाजपचे इच्छुक उमेदवार मागील सहा महिन्यांपासून तयारी करत असताना ऐन निवडणुकी दरम्यान या क्षेत्रात भाजपच्या निष्ठावान व इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला.