नागपूर: लोकसभेतील निकालापासून धडा घेत आता विधानसभेसाठी भाजपने कंबर कसली आहे.
या बंद लिफाफ्यानुसारच वरिष्ठांना अहवाल दिला जाणार आणि भाजपचा उमेदवार ठरणार आहे. त्यानुसार नागपूर शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये लिफाफे बंद झालेले आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा रंगलेली आहे.
भाजपाने नव्या पॅटर्ननुसार पक्षाच्या किमान दीडशे प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या मतदारसंघातील इच्छुकांच्या नावांची नोंद घेण्यात आली. आता पक्षाचे प्रदेश निवडणूक प्रभारी, प्रदेशाध्यक्ष व निवडणूक समिती सदस्यांपुढे हे लिफाफे मुंबईत फोडण्यात येईल. यातून मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या नावावर विचार करण्यात येईल, असे संकेत दिले आहे. मध्यप्रदेश, गोवा येथे ही पध्दत राबविण्यात आली होती. उमरेडमध्ये विक्की कुकरेजा निरीक्षक होते.
या ठिकाणी माजी आमदार सुधीर पारवे, प्रमोद घरडे, अरविंद गजभिये यांच्या नावाची चर्चा आहे. हिंगण्यासाठी माजी आमदार अशोक मानकर निरीक्षक होते. येथे आमदार समीर मेघे, संध्या गोतमारे, आदर्श पटले अशी नावे असल्याचे बोलले जात आहे. सावनेरसाठी माजी आमदार राजेश नजरधने निरीक्षक होते. येथे माजी आमदार आशिष देशमुख, डॉ. राजू पोतदार, प्रकाश टेकाडे, मनोहर कुंभारे तर काटोलसाठी आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर, दिनेश ठाकरे अशी नावे पुढे आली.
तीन दिवसांत प्रक्रिया
माजी आमदार विजय जाधव निरीक्षक होते. कामठी मतदारसंघात माजी आमदार हेमंत पटले निरीक्षक होते. त्यांच्या उपस्थितीत या मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, अनिल निधान यांची नावे दिल्याची माहिती आहे. रामटेकमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.