महाराष्ट्रात 29 नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यातील 25 आमदार तर शिवसेनेच्या कोट्यातील 5-7 आमदार आणि अजित पवार गटातील 5-7 आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात राजनाथ सिंह यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री चेहरा प्रस्थापित करण्यात राजनाथ सिंह महत्त्वाची भूमिका बजावतील. मुख्यमंत्रिपदासाठी तिन्ही पक्षातून जोर लावला जात आहे. अशातच भाजपच्या एका नेत्याने खळबळजनक ट्विट केलं आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.