Worli Assembly Constituency: मुंबईरांचे लक्ष लागलेला वरळी मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आहे. या मतदार शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव निश्चित झाले असून आता त्यांच्या विरोधात भाजपा तुल्यबळ उमेदवार देण्याचा तयारीत आहे. येथून भाजपाच्या नेत्या शायना एन. सी. आणि मनसेचे नेते संदिप देशपांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे वरळीत तिरंगी लढतीची शक्यता असून त्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.