काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी अवमानकारक आणि चुकीचे वक्तव्य केले.
कोल्हापूर : ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस नेत्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्याविरोधात चुकीचे आणि प्रक्षोभक विधान केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप महिला आघाडी अध्यक्ष रुपाराणी निकम यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांना दिले.