Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. सर्वच पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. अनेक नेते प्रचारसभांतून आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच. राहुल गांधींनी प्रचारसभेत खोटे बोलून बदनामी केल्याची तक्रार भाजपवर निवडणूक आयोगाकडे केली आहे. कोणत्याही आधाराशिवाय राहुल गांधी वारंवार भाजप संविधान बदलणार असल्याचे आरोप करत आहेत, अशी तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे.