यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी (ता.20) संकष्टी चर्तुर्थीच्या मुहूर्तावर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवीत उमेदवारी जाहीर केली. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून मदन येरावार, राळेगाव प्रा. डॉ. अशोक उईके तर वणी विधानसभा मतदारसंघातून संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.