हिंगणघाट (जि. वर्धा) : विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा समीर कुणावार यांना संधी दिली आहे. भाजपचा उमेदवार ठरलेला असला तरी महाविकास आघाडीतर्फे कोणत्या पक्षाला उमेदवारी जाणार यावरून अद्यापही स्पष्टता नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे जाईल असा अंदाज बांधल्या जात आहे.