गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून उद्या उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी शेवटचा दिवस आहेत. त्यामुळे उद्यापासून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापल्याचे पाहायला मिळणार आहे.
असे असले तरी राज्यातील सर्वच राजयकीय पक्षांनी यंदा त्यांच्या काही विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारत घरी बसवले आहे. यामध्ये मावळत्या विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाने तब्बल आठ आमदारांना यंदा उमेदावारी नाकारली आहे. तर भाजपनंतर काँग्रेसनेही 5 विद्यमान आमदार घरी बसवले आहेत.