‘‘भाजपची सत्ता असेपर्यंत आम्ही संविधान बदलणार नाही, कोणाचे आरक्षण काढून घेणार नाही.''
कोल्हापूर : महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. महायुती सत्तेत येण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा प्रामाणिकपणे प्रचार करायचा आहे. कोणी गद्दारी केली, तर त्याला पक्षातून काढून टाकले जाईल, असा स्पष्ट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी येथे दिला. इचलकरंजी येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.