गोंदिया : भाजपने महायुतीकडून गोंदिया, तिरोडा आणि आमगाव विधानसभेची उमेदवारी अलिकडे जाहीर केली. त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभेची तिकीट विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना हमखास मिळेल, अशा चर्चा असतानाच भाजपने नवा डाव साधत आपल्या जुन्याच गड्याला अर्थात माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या मनगटाला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार) घड्याळ बांधले.