मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीममधून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक मनसेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीने मनसेला माहीममध्ये पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त केली जात होता.
दरम्यान उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले की, माहीममध्ये भारतीय जनता पक्ष अमित ठाकरे यांचा प्रचार करणार आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र, अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरुन दोन गट झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या बाजूने आहेत. तर विद्यमान आमदार सदा सरवणकर मात्र, निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.