Maharashtra Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. भाजपला 126 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. .भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री असतील असा दावा केला आहे. दरेकर यांनी एक्झिट पोल आल्यानंतर भाजपला 122 जागा मिळतील असा दावा केला होता तो दावा आता खरा होताना दिसत आहे. .महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर लगेचच विविध एक्झिट पोल्सची आकडेवारी समोर आली. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार असल्याचं सांगण्यात आलं.. तर महाविकास आघाडी बहुमताच्या आकड्यापासून दूर रहावे लागेल असं म्हटलं होते. .एक्झिट पोल्सची आकडेवारी समोर आल्यानंतर महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण होते तर महाविकास आघाडीतील काही नेते मंडळीकडून सत्ताधाऱ्यांवर टीका, टिप्पणी आणि आरोप सुरू झाले होते. .संजय राऊत यांनी एक्झिट पोल्सच्या आकडीवारीवर विश्वास नसल्याचे सांगून,महाविकास आघाडीचे सरकार बनणार असल्याचा दावा त्यावेळी केला होता, पण आता राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून एक्झिट पोलचे अंदाज खरे होताना दिसत आहेत. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.