बुलडाणा : होऊ घातलेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविली जात आहे. त्याअनुषंगाने बुलढाणा विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाच्या वतीने निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, याकरीता निवडणुकीच्या कामाकरिता १ हजार ८५० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणुकी दरम्यानच्या हालचालींवर प्रशासनाचे बारीक लक्ष राहणार आहे.