वर्धा : विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजताच विद्यमानांसह प्रस्थापितांकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक इच्छुकांकडून आपल्या तयारीची माहिती महायुती आणि महाविकास आघाडीतील श्रेष्ठींना दिली. सारेच आपली उमेदवारी पक्की या आविर्भावात आहेत. परंतु, पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणालाही हिरवी झेंडी मिळाली नसल्याने आखाडा तयार पण उमेदवारांची प्रतीक्षा असल्याची स्थिती आहे.