चंदगड : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या नेत्यांचे अप्पी पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते. याची अधिकृत घोषणा होईल. चंदगडमधून गोपाळराव पाटील व अन्य मित्र गटांकडून त्यांना पाठिंबा मिळणार आहे..लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांचे चांगले सूत जमले. संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून त्यांच्यातील मैत्रीचे बंध अधिक घट्ट झाले. विधानसभा निवडणुकीलासुद्धा ही एकजूट कायम ठेवायची. आपल्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली, तरी त्याच्यासाठी एकत्रित प्रयत्न करायचे, असा निर्णय झाला. युतीत हा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, यावर उमेदवार कोण हे ठरणार होते. या मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवार निवडून गेल्यामुळे तो पक्ष हक्क सांगणार हे निश्चित होते. लोकसभा निवडणुकीनंतर डॉ. नंदिनी बाभूळकर पक्षाच्या नेत्या म्हणून सक्रिय झाल्याने त्यांनाच उमेदवारी मिळणार, याबाबत वर्तुळात चर्चा सुरू झाली. यावर आघाडीतील सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. महागाव (ता. गडहिंग्लज) येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.हेही वाचा.Kolhapur Elections : शौमिका महाडिक, मालोजीराजेंनी उमेदवारी अर्ज घेतला मागे; 30 पेक्षा अधिक अपक्ष उमेदवारांनी दाखल केले अर्ज.याला आघाडीतील सर्व घटक पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते. बाभूळकर यांचे थेट नाव न घेता विरोध दर्शवताना त्यांना उमेदवारी मिळाली तर आमच्यातून एकजण प्रतिस्पर्धी उमेदवार असेल, असा स्पष्ट संदेश वरिष्ठांना दिला. वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष करीत बाभूळकर यांनाच उमेदवारी दिल्यामुळे गोपाळराव पाटील, अप्पी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आपल्यापैकी एकजण उमेदवार असेल हे स्पष्ट केले. गोपाळराव पाटील यांचा चंदगड तालुक्यातील गट आणि अप्पी पाटील यांचा गडहिंग्लजमधील गट,यावर समीकरण मांडून अप्पी पाटील यांना चाल देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. या दोन्ही नेत्यांनी प्रत्येकी दोन विधानसभा निवडणुकी लढवल्या आहेत. दोघांनाही काठावरच्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.