नागपूर : भाजप महायुती विधानसभा निवडणूक विकासासाठी लढत आहे तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेते मुख्यमंत्री होण्यासाठी निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा रोज बदलत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.