Chhagan Bhujbal: ''ते' पुस्तक मी वाचणार अन् माझ्या वकिलांनाही देणार'', ईडीच्या भीतीबाबत भुजबळांचा पत्रकार परिषदेत खुलासा
ED Action: ''आम्ही खरंतर विकासासाठी भाजपसोबत आलेलो आहोत. ५४ लोकांनी सह्या केल्या होत्या, त्यांच्यावर काय ईडीची केस नव्हती. पण इथे आल्यानंतर आम्ही आमच्या मतदारसंघाचा विकास करु शकलो. माझ्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामं सुरु आहेत. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला होता, त्याचा आम्हाला फायदा झाला आणि होतो आहे.''
Maharashtra Assembly election 2024: राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ईडीच्या भीतीने भाजपमध्ये प्रवेश केला, असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या '२०२४: द इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया' या पुस्तकातून करण्यात आलेला आहे.