बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील चिखली विधानसभेत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील थेट मुकाबला झाला. २०१९ मध्ये भाजपच्या श्वेता महाले यांनी काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा पराभव केला होता, परंतु २०२४ मध्ये स्थिती पूर्णपणे वेगळी होती. यावेळी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरलेला होता, कारण काही वरिष्ठ कार्यकर्त्यांना वगळून बाहेरच्या नेत्यांना संधी दिली जात असल्याचे आरोप झाले. त्यामुळे यंदा निवडणूक अधिक रंगतदार झाली.
थरारक सामन्यात श्वेता महाले ३२०१ मतांनी विजयी झाल्या. त्यांना १०९२१२ मते मिळाली. तर काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी देखील टक्कर दिली. बोंद्रे यांना १०६०११ मते मिळाली.