चिमूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे विद्यमान आमदार बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले. आज दुपारी १२.३० वाजता नेहरू विद्यालय, चिमूर येथून सुरुवात केलेल्या भव्य रॅलीत हजारो समर्थकांचा ओघ होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भांगडिया यांनी ओहरी बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व विधिवत पूजा अर्चा करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर सजवलेल्या बैलबंडीने ते महसूल भवन येथे दाखल झाले.