Chinchwad Constituency: चिंचवडमध्ये इच्छुकांची संख्या वाढली; भाजपच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष
जयंत जाधव
पिंपरी: एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला चिंचवड विधानसभा मतदारसंघ गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाल्याचे चित्र आहे.
भाजपमध्ये गेलेले बहुतांश स्थानिक नेते हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचेच असल्याने मूळ निष्ठावंतांना इच्छा असूनही भावनांना मुरड घालावी लागत आहे.
भाजपमध्ये जगताप घराण्यातच पुन्हा उमेदवारी जाण्याची शक्यता असल्याने भाजपतील एक गट सक्रीय झाला आहे. महाविकास आघाडीकडेही इच्छुकांनी रांगा लावल्या असून, ही जागा कोणाला सुटते ? यावर बरेच गणित अवलंबून आहे.
अशी आहे स्थिती
भाजपने पक्ष निरीक्षकासमोर घेतलेल्या चिठ्ठ्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या अभिप्रायांमध्ये शंकर जगताप एक क्रमांकला
अश्विनी जगताप दुसऱ्या क्रमांकावर व कुठेच चर्चेत नसलेले काळुराम बारणे तिसऱ्या क्रमांकावर होते.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप रिंगणात नसल्याने यावेळी सत्ताधारी व विरोधी दोन्ही पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली आहे.
भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे व चंद्रकांत नखाते यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
शत्रुघ्न काटे यांनी पक्षात स्वत:चा एक गट निर्माण करुन निष्ठावंताची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.
चंद्रकांत नखाते वेळप्रसंगी अपक्ष लढविण्याच्याही तयारीत आहेत.
भाजप महायुतीची उमेदवारी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप किंवा आमदार अश्विनी जगताप यांना मिळण्याची दाट शक्यता आहे.
महाविकास आघाडीची चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीची चिंचवडची उमेदवारी मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राहुल कलाटे, विठ्ठल उर्फ नाना काटे, भाजपचे काही इच्छुक अशा अनेकांनी प्रयत्न केले.
शरद पवार यांच्याकडून इच्छुक ‘वेटींग’वर.
महाविकास आघाडीची चिंचवडची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राहुल कलाटे यांना मिळण्याची शक्यता.
निवडणूक मुद्दे
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना रोखणे व अनधिकृत बांधकामे नियमित करणे.
हिंजवडी आयटी हबजवळील वाकड, ताथवडे, पुनावळे या भागांतील वाहतूक कोडींची समस्या कायम असून मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सध्या दिवसाआड असल्याने तो नियमित व जादा दाबाने करणे.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.