Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे. महायुतीतील कोणता नेता मुख्यमंत्री होणार याची लवकरच घोषणा होणार आहे. तोपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजीनामा दिला. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.