सोलापूर : युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असते, असे म्हणतात. आता युद्ध म्हणजे निवडणुका असेच दिसू लागले आहे. निवडणुकीत समोरच्याला पराभूत करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. नावात साधर्म्य असलेले उमेदवार, निवडणूक चिन्हातील साधर्म्य यासह विविध फंडे निवडणुकीत डोकेदुखी वाढवून जातात.