काॅंग्रेस काश्मीरमध्ये 370 कलम परत लागू करणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. यावर काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शहा यांच्यावर टीका केली आहे. काॅंग्रेसमधील कोणताही नेता कलम 370 परत लागू करणार असल्याचे बोललेला नाही, ते खोटे बोलत आहेत. समाजात फूट निर्माण करण्यासाठी भाजप कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवत आहे असा आरोप खर्गेंनी केला.