संगमनेर: मी शिर्डी मतदारसंघाचा मतदार असून, संगमनेरप्रमाणे स्वातंत्र्याचे व आनंदाचे वातावरण राहाता तालुक्यात निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. राहाता तालुक्यातील जनतेला गुलामगिरी व दहशतमुक्त मुक्त करण्यासाठी ही लढाई असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आाणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.