Rahul Gandhi Enjoys Tarri Poha
नागपूर : प्रचारानिमित्त विदर्भ दौऱ्यावर पोहोचलेले काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी सायंकाळी नागपुरी खाद्य संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या झणझणीत तर्री पोह्यावर ताव मारला. त्यांनी रेसिपी जाणून घेण्यासोबतच झारा हाती घेत चक्क पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. हातात झारा घेतलेले राहुल गांधी यांना बघून उपस्थित ग्राहक अवाक झाले.