अर्जुनी मोरगाव: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांना काँग्रेसने अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी ‘पार्सल उमेदवार नको, स्थानिक उमेदवार हवा’, अशी मागणी करीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ताफा अर्जुनी मोरगावातील प्रसन्न सभागृहाजवळ आज अडविला. यावेळी ‘पार्सल हटओ, काँग्रेस बचाओ’चे नारेही दिले.