गडचिरोली, ता. २२ : सध्या काँग्रेस पक्षात एक जोडी 'जय-विरू' ची जोडी म्हणून गाजत असून राजकीय (चित्र) पटातील 'शोले' ची ही जोडी एकमेकांपासून जराही दूर राहत नाही, पण जिल्ह्याच्या राजकारणात या जोडीची ढवळाढवळ जास्तच वाढल्याने ही जोडी आगामी निवडणुकीत काँग्रेसला पराभवाच्या खड्ड्यात घालणार असे बोलले जात आहे. यातील जय जास्तच चलाख असून त्याला प्रमुख पद मिळाल्यापासून त्याने आपले मायाजाल पसरले आहे. जनतारूपी मौसीला, "मौसीजी दिसत आहे. पण जिल्ह्याच्या विरू तो बहोतही नेक और इमानदार लडका है," असे सांगत या विरूचे चांगभले करण्यास मदत केली. पण आता तो या विरूचा पिच्छा सोडायला तयार नाही.