Umred Assembly Elections 2024: हिंगण्यावर कॉंग्रेसचा डोळा; उमरेड राष्ट्रवादीच्या गळ्यात बांधणार ?

Umred Vidhan Sabha Elections 2024: मतदारसंघाच्या अदलाबदलीवरून राष्ट्रवादीत धाकधूक...
Umred Vidhan Sabha Elections 2024
Umred Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

नागपूर: हिंगणा मतदारसंघावर कॉँग्रेसचा ‘डोळा’ असून त्याऐवजी उमरेड राखीव मतदारसंघ राष्ट्रवादीला गळ्यात बांधण्याची चर्चा आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांत ‘धाकधूक’ वाढली असून कॉंग्रेसचा संभाव्य उमेदवार कोण, यावर खमंग चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अनेक वर्षे बालेकिल्ला असलेल्या हिंगणा मतदारसंघात समीर मेघे यांनी भाजपचा झेंडा रोवला. २००९ मध्ये विजय घोडमारे जिंकले. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. २०१४ मध्ये समीर मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून हिंगण्यावर दावा केला.

या निवडणुकीत विजय घोडमारे यांच्यासोबत ‘संधी’ करून समीर मेघे यांनी भाजपची उमेदवारी आणली. ते प्रचंड मतांनी विजयी झाले. माजी मंत्री रमेश बंग यांचा तब्बल २३ हजार मतांनी पराभव केला. यानंतर समीर मेघे यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत जवळीक साधून त्यांना भाजपत घेण्याचा सपाटा सुरू केला. ‘कार्यकर्ता जोडो’ यशस्वी मोहीम राबविली. वैयक्तिक स्तरावर त्यांना सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची ‘आघाडी’ तयार केली.

यामुळे प्रत्येक गावात फळी तयार झाली. तर रमेश बंग यांच्या कार्यकर्त्यांना सुरुंग लावल्याने ते कमकुवत झाले. यामुळे बंग यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक स्वतः न लढता विजय घोडमारे यांनी पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. यात घोडमारे पराभूत झाल्याने मतदारसंघात समीर मेघे यांची ‘शक्ती’ वाढली. त्यांना ‘शह’ देणे सोप नसल्याने दिसून आले.

Umred Vidhan Sabha Elections 2024
Jharkhand Assembly election updates: ''विधानसभा निवडणुकीच्या घोषणेबद्दल भाजपला आधीच माहिती होती'', बड्या नेत्याचा दावा

लोकसभा निवडणुकीत चमत्कार

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी २५ हजार ९१९ मतांचा आघाडी हिंगण्यातून घेतली होती. यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे दिसले. मात्र, २०२४ मध्ये शिंदेसेनेचे उमेदवार राजू पारवे यांना १७ हजार ८८२ मते कमी मिळाली. काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना तेवढीच लीड मिळाली. यामुळे हिंगण्यावर कॉंग्रेसचा ‘डोळा’ आहे. येथे भाजपचा सहज पराभव होऊ शकतो, हा आत्मविश्वास माजी मंत्री सुनील केदार यांना असल्याने त्यांना मतदारसंघ अदलाबदलीवर जोर दिला आहे. राष्ट्रवादीला उमरेड देऊन काबीज करण्याचा मनसुबा आहे.

उज्ज्वला बोढारे, कुंदा राऊत यांची चर्चा

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे हा मतदारसंघ राहिल्यास उज्ज्वला बोढारे, दिनेश बंग आणि विजय घोडमारे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. तर कॉंग्रेसकडे मतदारसंघ आल्यास कुंदा राऊत यांचा विचार होऊ शकतो किंवा उज्ज्वला बोढारे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवार बनविले जाऊ शकते. भाजपकडून समीर मेघे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन मते निर्णायक

जातीय समीकरणांचा विचार केल्यास हिंगण्यात कुणबी मतदार सर्वाधिक आहेत. त्यानंतर तेली समाज आहे. नवबौद्ध रिपब्लिकन मतदारांची संख्याही तेवढीच लक्षणीय आहे. बसप आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत हा मतदार राहिल्यास भाजपला लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन मतदारांनी काँग्रेसला साथ दिली. विधानसभा निवडणुकीत कोणाला साथ देईल, याकडे लक्ष लागले आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.