Assembly Elections 2024: 'हडपसर' आणि 'पर्वती'सह जिल्ह्यातील दौंड, जुन्नर आणि खेड या जागांवरही शहर कॉंग्रेसचा दावा !

Kasba Peth Vidhan Sabha elections 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.
Kasba Peth Vidhan Sabha elections 2024
Kasba Peth Vidhan Sabha elections 2024sakal
Updated on

पुणे: शहरातील हडपसर आणि पर्वतीसह जिल्ह्यातील दौंड, जुन्नर आणि खेड या जागांवरही शहर कॉंग्रेसने दावा केला आहे. तशी मागणी सोमवारी निरीक्षकांसमोर केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसला पुणे शहरासह जिल्ह्यात १० जागा हव्या असल्याचे स्पष्ट झाले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. बूथ समित्यांचा आढावा घेण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसकडून आज हैदराबाद येथील आमदार निजामुद्दीन काझी पुण्यात आले होते. त्यांनी दिवसभर बूथ अध्यक्ष, वॉर्ड, प्रभाग अध्यक्षांच्या बैठका घेऊन आढावा घेतला. त्यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निरिक्षकांची भेट घेऊन ही मागणी केली.

पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवाजीनगर, कसबा आणि पुणे कॅंटोन्मेट हे तीन मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहेत तर जिल्ह्यात भोर आणि पुरंदर या दोन जागा कॉंग्रेसकडे आहेत.

Kasba Peth Vidhan Sabha elections 2024
Pune Lok Sabha Election: शिवाजीनगर विधानसभेत काँग्रेसची जुनी ताकद लागली कामाला... तर सुशिक्षित भागातील मतदानाचा मोहोळ यांना फायदा

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात तीन तर पुणे शहरात दोन जागा वाढवून मिळाव्यात, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. पर्वती, हडपसर तसेच खेड, जुन्नर आणि दौंड येथे पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. तसेच या मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकदही आहे. त्यामुळे या जागा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर वरिष्ठांशी चर्चा करून अधिक जागा कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन काझी यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

जागा वाटपावरून कुरबूर होणार..

गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शहर कॉंग्रेसच्या वतीने येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जागा वाढवून मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. आज निरीक्षकांसमोरही हीच मागणी करण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील जागा वाटपावरून कुरबूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.