अमरावती, ता. २३: विधानसभा निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यात चांगलेच तापले असून अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडताहेत. बुधवारी (ता. २३) दर्यापूरचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. दर्यापूर मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीबाबत उद्यापर्यंत कोअर कमिटीकडून निर्णय घेतला जाईल, असे रवी राणा यांनी सांगितले.