बत्तीस शिराळा : राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असतानाच कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये पाऊसच्या सरी कोसळल्या. बत्तीस शिराळा इथं महायुतीचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभा सुरु असतानाच पाऊस सुरु झाला. यावेळी भाषणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उभे राहिले आणि त्यांनी भर पावसात भाषण केलं. यावेळी त्यांनी पावसातील सभेवरुन राजकीय टोलेबाजी केली.